सूुट्टी बिट्टी नाटक बिटक

सूुट्टी बिट्टी नाटक बिटक

Rs. 2,500.00
Skip to product information
सूुट्टी बिट्टी नाटक बिटक

सूुट्टी बिट्टी नाटक बिटक

Rs. 2,500.00
गोष्टीचे नाटक आणि नाटकाची गोष्ट घेऊन येतोय लहान मुलांसाठी धमाल गोष्टींची कमाल कार्यशाळा
जिथे पुस्तकातली पात्रे पानावरून  रंगमंचावर अवतरतील आणि मुलं आवाज, देहबोली, नवरसाच्या माध्यमातून सुंदर गोष्ट सादर करतील.

ही कार्यशाळा कोणासाठी?
नाटक, गोष्टी, गाणी, खेळ आणि कल्पनांच्या दुनियेत रमायला आवडणाऱ्या मुलांसाठी ही कार्यशाळा आहे. ज्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडतं, नवीन मित्र बनवायला आवडतं, स्टेजवर काहीतरी करून पाहायची उत्सुकता आहे, अशा मुलांनी नक्की सहभागी व्हावं. अभिनयाचा आधीचा अनुभव असणं अजिबात गरजेचं नाही; फक्त उत्सुकता आणि खेळकरपणा पुरेसा आहे.

का करावं नाट्य शिबिर?
मुलांच्या कल्पनाशक्तीला, आत्मविश्वासाला आणि स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याच्या क्षमतेला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा आहे. तीन दिवसांत खेळ, गोष्टी, संगीत आणि छोट्या नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून मुलांना नाटकाची मजा अनुभवता येईल. शेवटी सगळे मिळून एक छोटासा, कच्चा (raw) प्रयोग सादर करतील ज्यात मुलांचा सहभाग, कल्पना आणि आनंद हे सगळं दिसेल.

या शिबिरात मुलं काय शिकतील?
या कार्यशाळेत मुलांना अभिनयाची प्राथमिक ओळख मिळेल शरीराची हालचाल, आवाजाचा वापर, स्टेजवर वावरणं, आणि गोष्ट सादर करणं. त्याचबरोबर गटात काम करणं, एकमेकांचं ऐकणं, कल्पना मांडणं आणि त्या साकार करणं हेही शिकायला मिळेल. खेळ, गाणी, हालचाली आणि गोष्टींच्या माध्यमातून मुलं स्वतःची छोटी नाट्यदुनिया तयार करतील.

अनुभवी मार्गदर्शकांसोबत तीन दिवस नाटकाची मजा 

पल्लवी वाघ 
अभिनेत्री, रंगकर्मी, नाट्य प्रशिक्षक
थिएटर कोलाजच्या संस्थापिका

दिनांक: 13,14,15 नोव्हेंबर 2026
स्थळ: बाळासाहेब ठाकरे सभागृह, तीन हात नाक्याजवळ, सर्विस रोड, ठाणे
वेळ: सकाळी 10.00 ते 1.00
प्रवेश शुल्क: ₹ 2500-प्रत्येकी
वयोगट: 5+

तिकिटासाठी संपर्क: 9307874027

You may also like