सुट्टी बिट्टी नाटक बिटक

सुट्टी बिट्टी नाटक बिटक

Rs. 2,800.00
Skip to product information
सुट्टी बिट्टी नाटक बिटक
- -- -

सुट्टी बिट्टी नाटक बिटक

Rs. 2,800.00

खेळ खेळत, गाणी गात, नाटक शिकू या 
मुलांच्या उन्हाळी सुट्टीत काहीतरी वेगळं, सर्जनशील आणि मजेदार करायचं आहे का?

चिकूपिकू आणि Tiny tales घेऊन येत आहे धमाल तीन दिवसीय नाट्य शिबिर.
हे नाट्य शिबिर मुलांना नाटक, गोष्टी, गाणी, खेळ आणि कल्पनांच्या दुनियेत घेऊन जाणार आहे. या शिबिरात मुलांना खेळता खेळता अभिनयाची ओळख होईल, स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास वाढेल आणि गटात काम करत छोटासा नाट्यप्रयोग तयार करण्याचा अनुभव मिळेल.

शिबिराची माहिती:
दिनांक: 11, 12, 13 मे 2026
वेळ: सकाळी 9.00 ते 12.00
स्थळ: महिम्न सभागृह, कर्वे नगर, पुणे
वयोगट: 5+
शुल्क: ₹ 2800 प्रति सहभागी
प्रशिक्षक: प्रतीक्षा खासनीस आणि कल्पेश समेळ
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
मर्यादित जागा: 20

हे शिबिर कोणासाठी आहे ?
नाटक, गोष्टी, गाणी, खेळ आणि कल्पनांच्या जगात रमायला आवडणाऱ्या मुलांसाठी हे शिबिर आहे. ज्यांना स्वतःला व्यक्त करायला आवडतं, नवीन मित्र बनवायला आवडतात, स्टेजवर काहीतरी करून पाहायची उत्सुकता आहे अशा मुलांनी नक्की सहभागी व्हावं.
अभिनयाचा आधीचा अनुभव असणं गरजेचं नाही. उत्सुकता आणि खेळकरपणा पुरेसा आहे.

हे शिबिर का करावं?
मुलांच्या कल्पनाशक्तीला, आत्मविश्वासाला आणि स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हे नाट्य शिबिर आयोजित केलं आहे.

तीन दिवसांत खेळ, गोष्टी, संगीत, हालचाली आणि छोट्या नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून मुलांना नाटकाची मजा अनुभवता येईल.
शिबिराच्या शेवटी सगळे मिळून एक छोटासा प्रयोग सादर करतील, ज्यात मुलांचा सहभाग, कल्पना आणि आनंद दिसून येईल.

या शिबिरात मुलांना काय शिकायला मिळेल?
• अभिनयाची प्राथमिक ओळख
• शरीराची हालचाल आणि आवाजाचा वापर
• स्टेजवर आत्मविश्वासाने वावरणे
• गोष्ट सादर करणे
• गटात काम करणे
• एकमेकांचं ऐकणं आणि कल्पना मांडणं
• खेळ, गाणी आणि गोष्टींमधून सर्जनशीलता वाढवणे

या तीन दिवसांत मुलं स्वतःची छोटी नाट्यदुनिया तयार करतील.

You may also like