चिकूपिकू घेऊन येत आहे दोन धमाल नाटुकली पुस्तक न वाचणारी मुलगी आणि आपला जॉन.
पुस्तक न वाचणारी मुलगी
या गोष्टीतल्या मीनाला पुस्तकं वाचायला अजिबात आवडत नाही. पण एका दिवशी पुस्तकांच्या पानांतून चक्क प्राणी बाहेर येतात आणि तिच्या घरात धुमाकूळ घालू लागतात. आता त्यांना पुन्हा पुस्तकात पाठवायचं असेल, तर मीनाला पुस्तक वाचावंच लागणार आहे! मीनाची ही गोष्ट पुस्तकाच्या जादुई दुनियेत घेऊन जाते आणि मुलांमध्ये नकळत वाचनाची आवड निर्माण करते.
आपला जॉन
एका जंगलात एका रहस्यमय अंड्यावरून विविध पक्ष्यांमध्ये वाद सुरू होतो. प्रत्येक पक्ष्याला वाटतं की हे अंडं त्यांचंच आहे. पण या अंड्यातून जन्माला येतो एक असा पक्षी, जो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मग तो कोणाचा? आणि त्याला कोण आपलंसं करणार? पक्ष्यांच्या या अद्भुत जगातून मांडलेली ही कथा आपल्याला विविधता, मैत्री, सहानुभूती आणि एकमेकांना स्वीकारण्याचं सुंदर महत्त्व सांगते.
पेपेट्स, शारीरिक अभिनय, लोकसंगीताचे ठेके याचं सुंदर मिलाफ असलेली ही नाटुकली मुलांना आणि पालकांना नक्कीच आवडतील. तेव्हा आजच आपले तिकीट बुक करा.
दिनांक: 23 ऑगस्ट 2026
स्थळ: रवींद्र नाट्यमंदिर, लघु नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई
सकाळी 11.30 ते 12.30
आनंद विश्व गुरुकुल लॉ कॉलेज, मेंटल हॉस्पिटल रोड, ठाणे (प)
वेळ: संध्याकाळी 5 ते 6
तिकीट: ₹ 300 प्रत्येकी
1मूल + 1पालक: ₹ 550
वयोगट: 4+
कलाकार: महेंद्र वाळुंज, पूजा खानोलकर, नूतन दळवी, सचिन वीर
दिग्दर्शक: केतन जाधव
संगीत: शिवप्रणव अळवानी
लेखक: मंजुषा पावगी
मराठी अनुवाद: मिलिंद परांजपे
नेपथ्य, साहित्य व कठपुतळी: रोहित भोसले
कठपुतळी निर्मिती सहाय्य: स्वस्तिक नाईक
निर्मिती व्यवस्थापक: देवदास उचले
तिकिटासाठी संपर्क: 9307874027