चिकूपिकू घेऊन येत आहे लोककलेचा एक सुंदर उत्सव - होय महाराजा !
लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खास लोककलांवर आधारित मनोरंजक कार्यक्रम. नाटुकली, पोवाडा, भारूड आणि बरंच काही!
आपली संस्कृती, परंपरा आणि लोककलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, हा केवळ एक प्रयत्न नाही, तर आपला एक रिवाजच व्हावा, या भावनेतून चिकूपिकू घेऊन येत आहे होय महाराजा! यावेळी कुडजे गाव, पुणे येथे.
इंटरनेट आणि मोबाईलच्या काळात हळूहळू हरवत चाललेल्या लोककलांची मुलांना ओळख व्हावी आणि महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
चिकूपिकूच्या खास दिवाळी अंकातील गाऱ्हाणं, गवळण, बतावणी, भारूड आणि पोवाडा अशा लोककलांचं थेट रंगमंचावर सादरीकरण अनुभवायला मिळणार आहे. लोककलेतली गाणी, नाट्य, वाद्य आणि संगीत यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता घेता मुलांना त्यावर मस्त ठेकाही धरता येणार आहे!
चला तर मग, लोककलेचा हा उत्सव एकत्र साजरा करूया आणि आपल्या संस्कृतीचा हा सुंदर वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया!
दिनांक : 14 नोव्हेंबर 2026
वेळ : दुपारी 3 वाजता
स्थळ : झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय, कुडजे गाव, पुणे
वयोगट : 5+
तिकीट : 250 रु -प्रत्येकी
तिकिटासाठी संपर्क: 9307874027
( तिकिटात झपूर्झा संग्रहालय प्रवेश मोफत आहे )