या उन्हाळी सुट्टीत मुलांना टीव्ही , मोबाईल पासून दूर ठेवायचय ? तर मग 'चिकूपिकू' घेऊन येत आहे, 'गोष्टींचा गडबडगुंबा'. विराजस दादा 'जादूची टोपी' या गोष्टीचे सादरीकरण करणार आहे.
एका दुष्ट जादूगाराकडे जादुई टोपी असते आणि तो तिच्या जोरावर जंगलातील प्राण्यांना त्रास देतो. शेवटी प्राणी एकत्र येऊन त्याला चांगलाच धडा शिकवतात. या जादुई टोपीमुळे अनेक गमतीशीर प्रसंग घडतात. या सादरीकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही सेट, संगीत किंवा इतर नाट्य घटक नसताना केवळ अभिनयाच्या माध्यमातून विराजस दादा ही संपूर्ण गोष्ट जिवंत करणार आहे. तेव्हा जंगलातील प्राण्यांची टोपीमुळे होणारी गडबड अनुभवायला नक्की या! आजच आपले तिकीट बुक करा.
कलाकार:
विराजस ओढेकर - अभिनेता, Voice Over Artist
दिनांक: 26 एप्रिल 2026
स्थळ: मराठी ग्रंथ संग्रहालय, नौपाडा, ठाणे
वेळ: संध्याकाळी 5 ते 6
तिकीट: ₹ 200-प्रत्येकी | ₹ 350-1मूल+1पालक
वयोगट: 4+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027