दिवाळी म्हटलं की आकाशकंदील आलाच!
पूर्वी घराघरांत रंगीत कागद, काड्या, डिंक वापरून आकाशकंदील तयार केले जायचे. मुलं आकाशकंदील बनवायची आणि आई-बाबा, आजी-आजोबा त्यांना मदत करायचे.
आजकाल बाजारात कितीही सुंदर आकाशकंदील मिळत असले, तरी स्वतःच्या हातांनी बनवलेला आकाशकंदील घराबाहेर लावण्याची मजा काही वेगळीच!
हीच मजा पुन्हा अनुभवण्यासाठी चिकूपिकू घेऊन येत आहे खास आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा!
या कार्यशाळेत मुलं आणि पालक मिळून अपसायकल्ड म्हणजेच पर्यावरणपूरक आकाशकंदील बनवतील. यासाठी मदत करणार आहेत चित्रकार आभा भागवत. गप्पा मारत, एकमेकांना मदत करत आकाशकंदील बनवण्याची मजा अनुभवतील आणि स्वतः बनवलेला आकाशकंदील घरीही घेऊन जातील!
चला तर मग, यंदाच्या दिवाळीत आपल्या हातांनी बनवलेला आकाशकंदील घरात लावू या!
(आवडीचे पोस्टर कलर्स, ब्रश, पॅलेट, फडकं, कात्री सोबत येताना आणायची आहे. वर्तमानपत्र, फेविकॉल, स्टेपलर आमच्याकडून दिले जाईल )
तारीख : 1 नोव्हेंबर 2026
वेळ : संध्याकाळी 4 ते 6
स्थळ : अक्षरनंदन शाळा, एस.बी रोड, गोखलेनगर, पुणे
प्रवेश शूुल्क : ₹ 550/- (एक मूल + एक पालक)
वयोगट: 4+
तिकिटासाठी संपर्क: 9307874027